गावा विषयी माहिती
मौजे शिंगवे तुकाई हे गाव नेवासा तालुक्यातील पावन भूमीत वसलेले आहे. ज्या भूमीत सातसे वर्षापूर्वी जगाला दिशा दाखविणारा “ ज्ञानेश्वरी” हा पवित्र ग्रंथ लिहिला गेला अशा तालुक्यात हे गाव वसलेले आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ज्या जिल्ह्यामध्ये झाला अशा अहिल्यानगर जिल्हायात शिंगवे तुकाई गाव वसलेले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार गावाची २४८० इतकी लोकसंख्या आहे त्यामध्ये पुरुष १२७२ आणि महिला १२०८ आहेत. गावाची अनुसूचित जातीची लोकसंख्या ३३५ इतकी आहे तर अनुसुचित जमातीची लोकसंख्या १५५ इतकी आहे.
गावातील साक्षरतेचे प्रमाण८१.२८ टक्के आहे. शिंगवे तुकाई गावचे एकूण क्षेत्रफळ १३५८. १९ हेक्टर इतके आहे.
.


गावातील लोकाचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्याबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. तसेच गावाच्या हद्दीमध्ये midc असल्यामुळे गावातील तरुण मुले आणि महिला रोजगारासाठी त्या ठिकाणी जातात. सध्या midc चा विस्तार चालू आहे भविष्यात या midc चा गावाला आणि परिसराला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे. गावातील शेती हि प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गावात इयत्ता १ ते ४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.
शाळेचा परिसर अगदी हिरवाईने नटलेला आहे त्यात गावातील ८५ मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत.
त्याच बरोबर गावात गावठाण, दिघे वस्ती आणि विधाटे वस्ती अशा ०३ अंगणवाड्या आहेत. गावात इयत्ता ०५ ते १० पर्यत शिक्षणासाठी तुकाई विद्या मंदीर आहे त्यामध्ये गावातील आणि परिसरातील २६०-३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
तसेच गावाच्या परीसरात विधाटे वस्ती, महादेव मळा, झाडी वस्ती, धायबर वस्ती. देवीचा मळा. गुंड वस्ती, दिघे वस्ती अशा ०७ वस्त्या आहेत.
गावात प्राचीन काळातील श्रीराम मंदीर आहे. त्याचा सध्या लोकासहभागातून मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. तसेच गावात तुकाई मातेचे जुने मंदिर आहे त्याचा देखील गावच्या सहभागातून विकास केलेला आहे.
गावात ग्रामपंचायत मार्फत विविध योजना राबवून गावचा विकास केलेला आहेत. त्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा. स्मशानभूमी विकास, वृक्ष लागवड, घनकचरा साडपाणी व्यवस्थापन, आणि इतर विकासकामाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलला आहे




