
५ ते ७ हजार वर्षापूर्वीची कथा आहे कि,जिचा उल्लेख रामायणामध्ये देखील आहे.गावाच्या दक्षिण बाजूस देवीची दीपमाळ या ठिकाणी देवीचे जुने ठाणे येथे देवीच्या स्वरुपात प्रकट झाली.पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी लहान मुले-मुली चिखलाचा गाडीबैल खेळ खेळत असताना ती देवी त्या खेळणाऱ्या मुलांना म्हटली की,मला तुम्ही गाववस्ती कडे घेउन चला तेव्हा गावात येण्यासाठी टी देवी अदृश्य रुपात त्या गाड्यावर बसली.आणि त्या मुलांना सांगितले कि,तुम्ही ज्या ठिकाणी मला पाठीमागे पाहताल त्याच ठिकाणी मी अदृश्य होईल.ज्या वेळी देवी त्या चिखलाच्या/चीपटाच्या गाडीवर बसून गावाकडे येण्याचा प्रवास सुरु झाला तेव्हा अचानक देवी गाड्यावर आहे हे पाहण्यासाठी काही मुलांनी मागे वळून पहिले.तेव्हा त्या ठिकाणी एक मोठा वट वृक्ष होते.त्याच ठिकाणी देवी अदृश्य झाली.त्यावेळी त्या मुलांनी गावातील काही लोकांना घडलेली हकीगत सांगितली कि आमच्या चीपटाच्या गाड्यावर जी देवी बसली होती ती आपल्या गावच्या दक्षिण बाजूस २ किमी अंतरावर असणाऱ्या वटवृक्षाच्या झाडाखाली देवी अदृश्य झालेली आहे.त्यामुळे गावातील काही जाणकार मंडळी त्या ठिकाणी बघण्यासाठी गेले.परंतु त्या लोकांना त्या ठिकाणी फक्त एक गोल गोटा आढळून आला.
त्यानंतर पुढे बराच कालखड/पिढ्या निघून गेल्या त्यानंतर ज्या वेळेस श्रीराम प्रभू,लक्षमण आणि सिता नाशिक क्षेत्रात पर्णकुटी तयार करून राहत होते त्यावेळी रावणाने सिता मातेचे अपहरण केले होते.त्यावेळी श्रीराम प्रभू आणि लक्षमण सिता मातेच्या शोधात वनात फिरत होते.ज्या वेळी राम आणि लक्षमण त्या ठिकाणाहून जात होते त्यावेळी रामाच्या तोंडून निघणारे “सिते सिते” शब्द पार्वती माता यांनी एकले.तेव्हा पार्वती माता यांनी रामाची परीक्षा घेण्याचे ठरविले.त्यावेळी ती अदृश्य झालेली देवी तिचा संचार पार्वती मातेत झाला.आणि तिने हुबेहूब सिता मातेचे रूप धारण केले.त्यावेळी पार्वती माता सीतेच्या रुपात श्रीराम प्रभू याच्या समोर येऊन उभी राहिली आणि मीच तुमची सिता आहे असे सांगू लागली.तेव्हा श्रीराम प्रभू यांनी आपल्या अंतर्ज्ञानने ओळखले आणि श्रीराम यांनी उच्चारले कि “तू-का येथे आलीस आई घडविले नाही बसविले नाही म्हणून तुझे नाव तुकाई”या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांनी देवीची स्थापना करून तुकाई देवी नामकरण केले.आणि पुढे प्रभू श्रीराम सीतेच्या शोधार्थ दक्षिण दिशेकडे निघून गेले.त्यावरून गावाला शिंगवे तुकाई असे नाव पडले.

