RTI-2025

माहिती अधिकार कायदा २००५

RTI कलम 4 (1)(B) नुसार १ ते १७ मुद्दे माहिती

ग्रामपंचायत शिंगवे तुकाई
ता. नेवासा जि. अहिल्यानगर

प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, ग्रामपंचायत शिंगवे तुकाई या कार्यालयाची केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४(१)(ख) अन्वये प्रसिद्ध करावयाची १ ते १७ बाबीची माहिती अद्ययावत असल्याची खात्री करण्यात येत आहे. सदर माहिती मंजूर करून ती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

दिनांक: ०१/०१/२०२५
(स्वाक्षरी)

कार्यालय प्रमुख
नाव: श्री. तांदळे सुनिल नवनाथ
पदनाम: ग्रामपंचायत अधिकारी
कार्यालय: ग्रा. पं. शिंगवे तुकाई

संस्थेची रचना व कार्य

ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून नागरी सुविधा, विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य यांची जबाबदारी पार पाडते.

अधिकारी व कर्मचारी

  • सरपंच – धोरणात्मक निर्णय व देखरेख
  • उपसरपंच – सरपंचास सहाय्य
  • ग्रामपंचायत अधिकारी – प्रशासकीय कामकाज
  • कर्मचारी – कर वसुली, नोंदी ठेवणे, स्वच्छता,पाणीपुरवठा इ.

निर्णय घेण्याची प्रक्रिया

ग्रामसभा,महिला सभा,मासिक सभा,वार्ड सभा, कलम ४९ प्रमाणे स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्या ग्रामपंचायत बैठक व ठरावांद्वारे निर्णय घेतले जातात. आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी घेतली जाते.

कामकाजासाठी निश्चित मानके

  • जन्म/मृत्यू दाखले – 3 ते 7 दिवस
  • प्रमाणपत्रे – 7 दिवस
  • पाणीपुरवठा/स्वच्छता – नियमित सेवा
  • आरोग्य-नियमित सेवा.

लागू असलेले नियम, कायदे व अधिसूचना

  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958
  • RTI कायदा 2005
  • घनकचरा व्यवस्थापन नियम
  • वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय व परिपत्रके

कागदपत्रांचे वर्गीकरण

  • जन्म-मृत्यू नोंदी
  • कर नोंदी
  • ठराव पुस्तिका
  • विकासकामांची फाईल्स
  • पाणीपुरवठा नोंदी
  • नमुना न १ ते ३३
  • लेखासाहिता २०११ प्रमाणे

जनसहभाग

ग्रामसभा, महिला सभा, विशेष सभा, वार्ड सभा व सूचना पेटीद्वारे नागरिकांचा सहभाग घेतला जातो.

समित्या व मंडळे

  • पाणी व स्वच्छता समिती
  • शिक्षण समिती
  • आरोग्य समिती
  • कृषी समिती
  • शाळा व्यवस्थापन समिती
  • बालहक्क संरक्षण समिती
  • जैवविविधता समिती

अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती

  • सरपंच – श्रीमती प्रियांका दीपक पवार
  • उपसरपंच – श्रीमती.मंदा कारभारी विधाटे
  • ग्रामपंचायत अधिकारी- श्री.सुनील नवनाथ तांदळे
  • सदस्य – श्रीमती दिपाली योगेश गायकवाड
  • सदस्य – श्रीमती.सुनिता संतोष पुंड
  • सदस्य – श्रीमती.शांताबाई सुभाष पवार
  • सदस्य – श्री.सतीश पांडुरंग थोरात
  • सदस्य – श्री.दीपक कचरू पुंड
  • सदस्य – श्री.ज्ञानदेव देवराव माळी
  • सदस्य – श्री.अशोक लक्ष्मण धायबर
  • शिपाई:- श्री सचिन बाबसाहेब खरपुडे
  • पाणीपुरवठा कर्मचारी:-श्री किशोर मोहन गायकवाड
  • पाणीपुरवठा कर्मचारी:-श्री नवनाथ रामभाऊ धायबर

वेतन व भत्ते

शासन नियमांनुसार वेतन व भत्ते दिले जातात. सदर माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.

अर्थसंकल्प (Budget)

दर वर्षी साधारणपणे नोव्हेंबर मध्ये ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार केले जाते.सदर अंदाजपत्रकास ग्रामसभा आणि मासिक सभेची मंजुरी घेऊन सदर अंदाजपत्रक मंजुरीसाठी पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविले जाते.मा.सभापती आणि गटविकास अधिकारी याच्याकडून हे अंदाजपत्रक मंजूर केले जाते व निधी विकासकामांसाठी वापरला जातो.

योजना व लाभार्थी माहिती

  • प्रधानमंत्री आवास योजना
  • रमाई आवास घरकुल योजना
  • शबरी आवास घरकुल योजना
  • मोदी आवास घरकुल योजना
  • मनरेगा योजना
  • १५ वा वित्त आयोग योजना
  • जन्सुविधा योजना
  • नागरी सुविधा योजना
  • अनिसुचीत जाती आणि नवबौद्ध घटक वस्ती विकास करणे योजना
  • जलजीवन मिशन
  • इतर शासकीय योजना
  • लाभार्थ्यांची यादी कार्यालयात उपलब्ध आहे.

परवाने/सवलती

दुकान परवाने, बांधकाम परवाने व इतर परवान्यांची माहिती नोंदवहीत उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक माहिती

माहिती शासनाच्या वेबसाईटवर व डिजिटल माध्यमात उपलब्ध आहे.

माहिती मिळवण्याच्या सुविधा

RTI अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात सादर करता येतो. तसेच ओंनलाईन पद्धतीने देखील माहिती अधिकार अर्ज करता यतो,तसेच पोस्टच्या माध्यमातून देखील अर्ज करता यतो. कार्यालयीन वेळ: सकाळी ९.४५ ते सायं ६ प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवार कार्यालय कामकाज बंद राहते.

सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO)

सार्वजनिक माहिती अधिकारी – श्री सुनील नवनाथ तांदळे,ग्रामपंचायत अधिकारी शिंगवे तुकाई,ता-नेवासा

प्रथम अपीलीय अधिकारी – मा.गटविकास अधिकारी (BDO), पंचायत समिती नेवासा

द्वितीय माहिती अधिकारी-राज्य माहिती आयोग

इतर माहिती

जनतेसाठी आवश्यक सर्व माहिती कार्यालयात उपलब्ध करून दिली जाते. कार्यालयीन वेळेत सदर माहिती उपलब्ध करून दिली जाते. तसेच १५ वा वित्त आयोग ई ग्राम स्वराज पोर्टल वर ओंनलाईन देखील उपलब्ध आहे.